जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी भागातील पिकांची,पिण्याचे
पाणी,रोजगाराचे प्रश्न ,जनावरांची
चाराटंचाई आदीची पाहणी करून, समस्यांचा अहवाल तयार
करून मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत देवून लवकरच दुष्काळाच्या उपाययोजना
राबवण्यात येतील. नियमित कर्जफेड करणाऱ्या वंचीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ
अनुदान घेण्यासाठी सहाय्यक निबंधक यांच्याकडे अर्ज करावेत,असे
आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
कुंभारी (ता.जत) येथे दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष
पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी
सवांद साधला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित केलेल्या या बैठकीला कुंभारी,
कोसारी,वाळेखिंडी परिसरातील शेतकरी यावेळी
उपस्थित होते. जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती ऍड.प्रभाकर जाधव यांनी
मांडली. पाऊस नसल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेंभू योजनेत
बेवनूरसह सहा गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी
केली.नाथा पाटील,कुंडलिक पाटील यांनी शेतकऱ्यांच्या, शेतीच्या व्यथा मांडल्या.
जत तालुक्यामध्ये पावसाने पाठ
फिरवल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.याचबरोबर पशुधनदेखील संकटात
सापडले आहे.दुष्काळग्रस्त परिस्थिती ची पाहणी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी
कुंभारी ता. जत येथे पाहणी केली असता शेतकर्याने रब्बी हंगामातील अपुरे
पावसावर पेरणी केलेली जळण्याच्या अवस्थेत दिसून आली.शेतकरर्याशी संवाद साधला व
त्यांचा व्यथा जाणून घेतल्या . लवकरच कॅबिनेट मध्ये हा
वस्तुस्थितीचा अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी
आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह
देशमुख,शिक्षण सभापती तम्मनगौडा रवीपाटील, सभापती शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता
जाधव, महादेव पाटील, डॉ. रवींद्र आरळी,
ऍड.श्रीपाद अष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी ,रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, सरपंच राजू
जावीर आदी उपस्थित होते.
यावेळी
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, पंचायत समिती सदस्य अर्चना
पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष नानासो सूर्यवंशी, आप्पासाहेब जाधव, शिवाजी बंडगर, विजय पाटील,भाऊसाहेब शिंदे, संजय
टोणे आदी उपस्थित होते.
(कुंभारी ता.जत येथे जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी आमदार विलासराव जगताप, संग्राम
देशमुख,डॉ.रवींद्र आरळी,प्रभाकर जाधव,
सभापती शिवाजी शिंदे उपस्थित होते.)

No comments:
Post a Comment