देशभरात आता समान मुद्रांक शुल्क
-वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण
निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. समभाग, कर्जरोख्यांच्या
हस्तांतरणासाठी देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. याबाबतचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी
दिली.
ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवींचे
निधन- मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तिमत्त्व
म्हणून ओळखल्या जाणार्या ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे
शनिवारी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकांतवासातच
होत्या. सतार वादनातले त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण होते.
पद्मभूषण या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पहाटे 3 वाजून
51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांना गेल्या काही वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रासले होते.
तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेचा
विनयभंग; सहायक फौजदार निलंबित-तक्रार देेण्यासाठी
पोलिस चौकीत गेलेल्या महिलेची जुजबी तक्रार घेऊन त्यानंतर रात्री-अपरात्री तिला फोन करून तिचा विनयभंग करणार्या सहायक
फौजदारावर गुन्हा दाखल करत त्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. रामनाथ पालवे असे निलंबित केलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे.
पालकमंत्र्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी
अडविले- आटपाडी: दुष्काळाबाबत उपाययोजना
संदर्भात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोरच भाजप शिवसेना पदाधिकार्यांमध्ये वादावादी झाली. शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
होते. प्रश्न सुटल्याशिवाय जाऊ देणार नाही.
प्रथम पिण्याचे पाणी द्या, नंतर शेतीला पाणी द्या,
टेंभूचे पाणी एकर एकराला एक हजार रुपये घेण्याऐवजी तीन हजार रुपये घेतले
जात असल्याची तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
इस्लामपुरात एटीएम फोडून
11 लाख लंपास- इस्लामपूर : येथील कोल्हापूर रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून अकरा लाख
45 हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.शनिवारी पहाटे दोन ते अडीच दरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांनी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गॅस कटर वापरून अवघ्या काही मिनिटांत मशीन कापले आहे.
काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एटीएम च्या बाहेर
80 हजारांच्या नोटा पडल्या होत्या.
वाहतूक नियमांचा भंग करणार्यांकडून 14 लाख वसूल - सांगली पोलिसांनी जिल्हाभर
नाकाबंदी करुन वाहतुक नियमांचा भंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई
केली आहे. दि.2 ते 9 ऑक्टोंबर या कालावधित तब्बल 6 हजार 23 केसेस करुन सुमारे 14 लाख 25 हजार
रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षांकडून देण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला
लागावे- शिराळा :काँग्रेसच्या सर्व जुने,
सम विचारी नेते, कार्यकर्ते यांना एकत्र करून सत्यजित
देशमुख यांना बळ देणार असून या मतदारसंघाचा इतिहास पाहता. आतापर्यंत
आघाडीच्या समीकरणामध्ये हा मतदारसंघ काँगेसचा आहे आणि काँग्रेससाठीच राहील,
कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे
आवाहन वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केले.
डॉ. खुशबू मदन
लाल यांना डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार- मिरज
: श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवातील तिसरा दिवस हा नेहमी डॉ.
अबन मेस्त्री यांच्याच नावाने ओळखला जातो. सुप्रसिद्ध
तबलावादक कै. अबन मेस्त्री यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा
डॉ. अबन मेस्त्री गौरव पुरस्कार बदायूँ (उत्तर प्रदेश) येथील उदयोन्मुख तबलावादक डॉ. खुशबू मदन लाल यांना सांगली जिल्हा धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या हस्ते व स्मिता शिरगावकर (उगार)
तसेच जितेनभाई झव्हेरी, रूपा सेठना यांच्या उपस्थितीत
प्रदान करण्यात आला.
कवठेएकंदमध्ये दसरा उत्सवाची जय्यत
तयारी- कवठेएकंद येथील ग्रामदैवत श्री सिद्धराज देवस्थानच्यावतीने
नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने घटस्थापना, पूजा अर्चा, ‘श्री’चा अभिषेक, दैनंदिन आरती कार्यक्रम
होत आहेत.
No comments:
Post a Comment