जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील तिकोंडी येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेले उपोषण आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सोडले. काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्य, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले.
तिकोडी येथील अतिक्रमण काढण्यात यावे व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रायप्पा राचगोंड,बसंगौडा पाटील, रंमगोंडा पाटील, गुड़ु मुल्ला,सुरेश कट्टीमनी,ईश्वर हदिमनी,काशीराम माळी,सदाशिव पाटील यांनी तिकोडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पंचायत समतितीचे विस्तार अधिकारी श्री. जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस नेते जिल्हा परिषद सदस्य जि.म.बँकेचे संचालक विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले. या वेळी माजी पं स.सदस्य पिराप्पा माळी, जलिंद्र व्हनमाने,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,करेवाडी सरपंच हिंदूराव शेंडगे,बसवराज पाटील,अमर माने,मिथुन माने, व ग्रामसेवक, ग्रा.प.सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment