सांगली,(प्रतिनिधी)-
अनेक दिवसांपासून
प्रतीक्षेत असणारा यशवंत पंचायतराज अभियानाच्या पाहणीचा निकाल अखेर जाहीर झाला.
यशवंत पंचायतराज अभियान 2016-17 मध्ये सांगली जिल्ह्याने
राज्यात पहिला क्रमांक पटकावला. एप्रिल महिन्यात राज्यपातळीसाठी
पाहणी झाली होती. जिल्ह्यातील शिराळा तालुक्याने राज्यपातळीवर
तिसरा व पुणे विभागात पहिला क्रमांक मिळवला असून आटपाडी तालुक्याने पुणे विभागात तिसरा
क्रमांक मिळवला.
पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट
काम करणार्या जिल्हा परिषद, पंचायत
समिती व ग्रामपंचायतींसाठी विभाग; तसेच राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज
ही योजना राबवण्यात येत आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये याबाबतची जिल्हा पातळीवरची पाहणी झाली होती. त्यानंतर
मार्च महिन्यात विभागीय पातळीवरची पाहणी करण्यात आली. एप्रिल
महिन्यात राज्यपातळीवरील पारितोषिक वितरण समितीने सांगली जिल्ह्याची पाहणी केली.
सांगली जिल्हा परिषदेने 2016-17 या वर्षात केलेलं
काम उत्कृष्ट होते. या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाला.

No comments:
Post a Comment