गुरुवार दि.18 ऑक्टोबर 2018
एम. जे. अकबर यांचा राजीनामा
नवी दिल्ली: लैंगिक छळाच्या
आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर परराष्ट्र राज्यमंत्रिपदाचा बुधवारी राजीनामा दिला.
दसर्यानिमित्ताने बाजारपेठ सजली; झेंडूचे दर शंभरच्यावर
सांगली:आज विजयादशमी म्हणजेच
दसरानिमित्त बाजारपेठ सज्ज झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू,
मोबाईल, दुचाकी, चारचाकी
वाहनांच्या खरेदीसाठी आज गर्दी होईल, अशी शक्यता आहे.
बाजारपेठेतील दुकाने विद्युत रोषणाईने उजळून गेली आहेत.
मुख्यमंत्री 24 रोजी सांगली दौर्यावर
सांगली:
सांगली जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा अ ा ढ ा व ा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हे 24 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या वेळी मुख्यमंत्री पाच तास आढावा बैठक
घेणार आहेत.
प्लास्टिक आढळल्यास गुन्हे दाखल
करणार
मुंबई:
मोठ्या देवस्थानात अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे
निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा वापर रोखण्यासाठी कडक कारवाई
करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दसरा उत्सवासाठी कवठेएकंदनगरी सज्ज
कवठेएकंद: कवठे एकंद
(ता. तासगाव) येथे दसर्याची रात्र शोभेच्या आतषबाजीने उजळून निघते. ग्रामदैवत
श्री बिर्हाडसिध्द देवस्थानचा विजयादशमी दसर्या दिवशीचा पालखी सोहळा त्यानिमित्ताने साकारण्यात येणारी नयनरम्य आतषबाजीचा
नजराणा म्हणजे सिद्धराज महाराजांवरील भक्तिपरंपरा आणि कलेचा आविष्कार शोभेच्या आतषबाजीतून
साकारण्यात येतो. गुरुवारी होणार्या पालखी
सोहळ्याचा प्रारंभ रात्री नऊपासून मंदिरातून ’श्री’च्या आरतीनंतर होणार आहे.
जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश वीरेंद्र
बिस्ट यांची ठाणे येथे बदली
सांगली: सांगली जिल्ह्याचे
प्रधान न्यायाधीश वीरेंद्र बिस्ट यांची ठाणे जिल्हा न्यायालयाकडे बदली झाल्याचे बुधवारी
सांगली न्यायालयातून सांगण्यात आले. सांगलीत मिरज रोडवर जिल्हा
न्यायालयाच्या आकर्षक आणि भव्य इमारत उभारणीच्या अंतिम टप्प्यात न्यायाधीश बिस्ट यांनी
महत्त्वाचे योगदान दिले असून त्यांच्या कार्यकालातच न्यायालयाच्या ऐतिहासिक वास्तूला
निरोप देऊन नूतन प्रशस्त इमारतीत न्यायदानाचे कामकाज सुरू झाले आहे.
जात व वैधता प्रमाणपत्र दाखल हमीपत्राच्या
मुदतीत वाढ
सांगली:महाराष्ट्र जिल्हा
परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सन 2018 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 21 मध्ये सुधारणा करण्यात
आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक
31 मार्च 2016 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत
समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक 7 मे 2016 पासून राखीव जागेकरीता निवडणूक लढविणार्या व्यक्तीने
जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दाखल केलेल्या हमीपत्रामध्ये विनिर्दिष्ट करण्यात
आलेली सहा महिन्याची मुदत वाढविण्यात आलेली असून ती बारा महिन्यांची करण्यात आली आहे,
अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव यांनी दिली.
सातारा सैनिकी शाळेची प्रवेश प्रक्रिया
सुरू
सांगली: सैनिकी शाळा, सातारा येथे इयत्ता 6 वी आणि 9 वी साठी 2019-20 सत्राच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या शाळेत मुलींना प्रवेश दिला
जात नाही. विद्यार्थी प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरू
शकतात. प्रवेश परीक्षा अर्ज दिनांक 8 ऑक्टोबर
ते 26 नोव्हेंबर पर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असतील. ऑनलाईन अर्ज जमा होण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर आहे.
प्रवेश परीक्षा नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जार सांगली : प्रतिनिधी दसरा हा सण
18 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. दसर्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके, आतषबाजी अशा ज्वालाग्रही
पदार्थांचा वापर केल्यामुळे ध्वनी व हवेचे प्रदुषण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता
मनाई आदेश जारी केला आहे.
कर्जमाफीच्या दहाव्या यादीतील 4 कोटी 20 लाख रुपये उपलब्ध
सांगली:राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील दहावी ग्रीन
लिस्ट पंधरा दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती. कर्जमाफी आणि प्रोत्साहन
अनुदानासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम
जिल्हा बँकेला उपलब्ध झाली असून संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर
वर्ग करण्यात येत असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment