जत,(प्रतिनिधी)-
अलिकडच्या काही वर्षांत विक्रम फौंडेशनच्यावतीने
जत शहरात सातत्याने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमिताने सेलिब्रिटींच्या उपस्थितीत दांडिया स्पर्धाही
घेतल्या जातात. यंदाही जत येथील रामराव विद्यामंदिर पटांगणावर
20 आनि 21 ऑक्टोबर रोजी भव्य दांडिया स्पर्धा आयोजित
करण्यात आल्याची माहिती विक्रम फौंडेशनच्या संचालिका मीनल सावंत यांनी पत्रकारांना
दिली.
या निमित्ताने कलर्स मराठी या वाहिनीवर
गाजत असलेल्या कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेतील
रमा अर्थात अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे आणि लागिरं झालं जी या झी टीव्हीवरील मालिकेतील
अभिनेता अमित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी
रामराव विद्यामंदिर येथे कपल, ग्रुप दांडिया स्पर्धा होणार असून
या दिवशी अभिनेता अमित कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तर दुसर्यादिवशीच्या महिलांच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री
भाग्यश्री न्हालवे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहे. या दोन्ही
दिवशी र्हीदम स्पेशालिस्ट कलाकारांचा ऑर्केस्ट्रा असून या दिवशी
बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पॉट गेम्स आणि फनी गेम्सचेही
आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा पार पाडण्यासाठी विजया बिज्जरगी, गीता सावंत, अनुराधा संकपाळ,
मीरा शिंदे, ज्योती घाडगे, अनिता शिंदे, नीलम थोरात, भारती
तेली, सरिता मालाणी, नीता मालाणी,
दया कुलकर्णी, वर्षा राठोड, निशा गडीकर, रेखा माने यांचे प्रयत्न राहणार आहेत.
या स्पर्धेत व अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे, असे आवाहन मीनल सावंत यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment