जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील हीरा वाईन शॉपमधून दारूची अवैध वाहतूक
करणाऱ्या वाहनावर जत पोलिसांनी कारवाई केली.सोळा हजार 402 रुपयांची
दारू व बोलेरो (एमएच 09 बीएक्स 8248)असा तीन लाख 16 हजार 402 रुपयांचा
मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.शुक्रवारी रात्री अकरा वाजता ही कारवाई करण्यात
आली. या प्रकरणी पोलीस नाईक राजेश कांबळे यांनी फिर्याद दिली असून सचिन केशव काटे
(वय 21, रा.मुचंडी) यास अटक केली आहे.
No comments:
Post a Comment