जत,(प्रतिनिधी)-
जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल
आणि जुनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु. मृणाल
थोराप्पा कांबळे या विद्यार्थीनीने जिल्हास्तरीय तायक्वांदो (59 ते 62 वजनी गटात) प्रथम क्रमांक
पटकावला आहे.
कु.मृणाल कांबळे हिने राष्ट्रीय स्पर्धेसह विविध पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग
नोंदवला आहे. आता तिची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
तिचे वडील कंठी (ता.जत)
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. कु. मृणाल हिला तिच्या वडिलांसह रामराव विद्यामंदिरमधील
क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
अभिनंदन मृणालचे व मार्गदर्शक शिक्षकांचे
ReplyDeleteअभिनंदन मृणालचे व मार्गदर्शक शिक्षकांचे
ReplyDelete