जत, (प्रतिनिधी)-
अभियंता आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असल्याशिवाय विकासकामे होत नाहीत, जत तालुक्यात अभियंत्यांनी चांगली कामे केली,असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी जत केले.
जत येथील बचत भवनमध्ये तालुका कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन व बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सर विश्वेशरय्या यांच्या जयंतीनिमित्त कै. महादेव अण्णा अवताडे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट अभियंता, उत्कृष्ट अधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी होते. यावेळी दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे, अॅड. प्रभाकर जाधव, सौ. ममता तेली, शिवाजीराव ताड उपस्थित होते. यावेळी अभियंता ते आमदार म्हणून काम केल्याबद्दल आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारणाची कामे उत्कृष्ट केल्याबद्दल कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी खोत यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, म्हैसाळ योजना पाटबंधारे कार्यालय व पंचायत समिती बांधकाम विभागातील अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत सलीम गवंडी यांनी केले. यावेळी संतोष देवकर, समिर नदाफ, शारन्नाप्पा आक्की, सुनिल जाधव, आर.व्ही.मठ, महादेव साळुंखे, ए.डी.पवार, जी.आर.पखाली, अर्षद गवंडी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment