जत,(प्रतिनिधी)-
जतजवळील खलाटी येथील लक्ष्मण निवृत्ती
शिंदे (वय-69) यांच्या शेतात छापा टाकून
पोलिसांनी सुमारे दीड लाखांचा गांजा जप्त केला. भेंडीच्या शेतात
320 गांजाची झाडे मिळून आली आहेत. याप्रकरणी जत
पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
जतच्या उपविभागीय अधिकारी शर्मिष्ठा
वालावकर यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली. खबर्याकडून पोलिसांना टीप मिळाली
होती. त्यानुसार जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार,
पीएसआय श्री. गुंडरे, पोलिस
कर्मचारी प्रशांत गुरव, वहिदा मुजावर, शंकर
पवार, सुनील व्हनखंडे यांच्या पथकाने पहिल्यांदा सोमवारी रात्री
छापा टाकला. मात्र रात्र असल्याने गांजांच्या झाडांचा अंदाज आला
नाही. त्यामुळे पोलिसांनी रात्री तिथेच तळ ठोकळा. व पुन्हा सकाळी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात धाड टाकली.
यावेळी शिंदे याने त्याच्या भेंडीच्या
शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. चार
ते पाच फूट उंचीची 320 गांजाची झाडे मिळून आली. या सर्वांचे वजन 30 किलो इतके भरले असून त्याची बाजारात
किंमत एक लाख 51 हजार 165 रुपये इतकी होते.
या प्रकरणी लक्ष्मण शिंदे यास ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment