जत,(प्रतिनिधी)-
जत शहरासह तालुक्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांना
आणि विद्युत रोषणाईला फाटा देत अलिकडच्या काही वर्षांत महाप्रसादाच्या वाटपाला पसंती
दिली आहे. उत्सव काळात रोज एक-दोन मंडळांचा
महाप्रसाद सुरू असल्याने भाविकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
गणेशमूर्तीच्या स्थापनेपासूनच शहरात पहिल्या दिवसांपासून
दररोज महाप्रसादाच्या पगंती उठू लागल्या आहेत. गेल्या चार-पाच वर्षात विद्युत रोषणाईवरील खर्च कमी करून महाप्रसादालाही प्राधान्य दिले
आहे. बहुतांश मंडळांनी सभासदांच्या घरातील मंडळींसाठी आणि गणेशभक्तांसाठी
महाप्रसादाचे आयोजन केले होते . रेव्हेन्यू गणेशोत्सव मंडळ,
संभाजी चौक गणेश उत्सव मंडळ, जत पोलीस ठाणे गणेश
मंडळ, विद्या नगर गणेश मंडळ आदीसह अनेक मंडळांनी महाप्रसादाचे
आयोजन केले होते. समता मित्र मंडळ, खासगी
चालक मालक संघटना अशा अनेक मंडळांनी महाप्रसादाचे वाटप केले.याचा
शहरातील हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला.
No comments:
Post a Comment