Tuesday, September 18, 2018

साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब : प्राचार्य ढेकळे

जत, (प्रतिनिधी)-
साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे.सामाजिक वास्तव लेखक कलात्मकपणे साहित्यामध्ये मांडत असतो. स्वस्थ मानवी समाज व मूल्यांची बीजे साहित्य माध्यमातून प्रकट होतात.जागतिकीकरणाची बदलती सर्व समीकरणे ही साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यादृष्टीने इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबरोबरच इंग्रजी साहित्य व समीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एस. ढेकळे यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यानात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.ढेकणे बोलत होते. या व्याख्यानासाठी मुंबई विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. एल.बी.पाटील उपस्थित होते. ते ऑरिस्टोटलचे विरेचन व अनुकरण या विषयावर बोलताना म्हणाले, “जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियरच्या ऑथेलो ,मैकबेथ, ज्युलियस सीझर या शोकांतिका  आज देखील बेस्ट सेलिंगमध्ये गणल्या जातात यापाठीमागील गुपित म्हणजे विरेचन या तंत्राचा शेक्सपियर ने खुबीने केलेला वापर होय.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.रामदास बनसोडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.विजय यमगर यांनी केले तर आभार प्रा.आर.डी.करांडे यांनी मानले. यावेळी प्रा.एच.डी.टोंगारे,प्रा.सतीशकुमार पडोळकर यांच्यासह विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment