Saturday, September 29, 2018

थोडक्यात पण महत्त्वाचे


  जत शहरातील शिवनगर मित्रमंडळाच्यावतीने नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. या मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. कायलीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा उपक्रम यंदा राबवण्यात आला. जवळपास 700 गणेशमूर्ती जमा करून नंतर अथणी (जि. बेळगाव) येथील हल्याळजवळील कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यंदा स्वच्छतेला महत्त्व देत मंडळाने परिसरातील 150 कुटुंबांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पापा कुंभार, नगरसेवक उमेश सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  जत शहरातील अंगणवाडी क्रमांक 181,182 आणि 164 मध्ये दहीहंडी, प्रभातफेरी आणि वजन,उंची मापन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, नगरसेविका सौ. दीप्ती सावंत आणि स्वाती हिरवे उपस्थित होत्या. राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका प्रतिभा जेऊरकर, शकुंतला संकपाळ, शकु शिंदे, कविता पाथरुट, कल्पना जेऊरकर आदी उपस्थित होते.
  गोंधळेवाडी (ता.जत) येथील सदगुरु बागडेबाबा मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी राळेगणसिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली व जत तालुक्यात येण्याचे निमंत्रण दिले. मम्गळवेढा तालुक्यातील चिकलगी (भुयार)येथे अध्यात्माबरोबरच उद्योग उभारणी करून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तुकाराम महाराज यांनी अण्णा हजारे यांना यावेळी सांगितले.



No comments:

Post a Comment