मुले आणी बायको रात्री गाढ झोपून जातात, अगदी निर्धास्तपणे,... कुठलीच काळजी नसते त्यांना, त्याचे एकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंब प्रमुख, तो जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्या कुटुंबासाठी तो आधारवड असतो, ज्या वेळी त्याचे कुटूंब निर्धास्तपणे झोपलेले असते त्यांना विश्वास आहे आमची जबाबदारी घेणारा कुटुंबप्रमुख खंबीर आहे, पण त्याच वेळी तो मात्र जागा असतो, तिच एकमेव रात्रीची वेळ त्याला विचार करण्यासाठी अनूकुल असते, मुलांच्या भविष्याची, कुटूंबाच्या उभारणीची, अनेक विचाराचे चक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत असते, नकळत त्याला डोळा लागतो आणी तो झोपून जातो, रात्री बेरात्री जाग आली तर तो मुलांकडे आणि बायकोकडे पाहत असतो, त्यांच्या अंगावरचे पांघरूण सावरुन परत तो झोपतो, उद्याचे स्वप्न पाहात ....! पुरूष त्याच्या मनातल्या भावना पटकन बोलून दाखवत नाही, रडता येत नाही म्हणुन कुढत आणि काळजीत जीवन जगत असतो...... ही एका कुटुंबाप्रती जबाबदार पुरूषाची लक्षणे आहेत, कुटुंब जस जसे मोठे होत जाते तशी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी वाढत जाते, ...... संसार करणे आणि तो निभावणे वाटते तितकी साधी आणी सोपी गोष्ट नसते. संसाराची किंमत त्यांना विचारा ज्यांचा संसार अर्धवट राहीलाय, कधी अकाली निधनाने पुरूष तर कधी स्त्री संसारातून बाहेर पडते..... लग्न करुन बायकोला घरी घेऊन येणे व दोन मुलांना जन्माला घालणे याला पुरूष म्हणत नाही मंडळी, पुरूष त्यालाच म्हणतात जो कुटुंबाची पुर्ण जबाबदारी पार पाडून बायकोची आणि मुलांची सर्व स्वप्ने साकार करतो, ..... समाज्यासाठी तुम्हाला काही करता आले नाही तरी चालेल.....! पण स्वतःच्या बायको मुलांसाठी, आपल्या आई वडीलांसाठी तुम्ही कुटुंबातले हिरो म्हणून जगले पाहीजे, एक आदर्श पती, आदर्श बाप आणि आदर्श मुलगा हीच ओळख किमान कुटुंबाप्रती प्रत्येक पुरूषाची असावी.
***** ***********************************************************************************************************
जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात, शब्द नातं देतात शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं.
************************************************************************************************************************
तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो. ‘अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये‘. त्यावर एकाने लिहिले, दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का? बिनडोक कुठले!
************************************************************************************************************************
शाहरुख खान त्याच्या नव्याकोर्या महागड्या गाडीतून जात होता. अचानक त्याला कार चालविण्याची हुक्की आली. त्याने ड्रायव्हरला मागे बसवले व स्वत: कार चालवण्याचा आनंद घेऊ लागला; पण सिग्नल तोडल्याने एका हवालदाराने गाडी अडवली. हवालदार आत वाकून बघतो तर शाहरूख खान ! तो हादरतोच आणि इन्स्पेक्टर साहेबांना हाक मारून म्हणतो. ‘सर, सिग्नल तोडला म्हणून मी गाडी अडवली; पण पावती फाडण्याची माझी हिंमत होत नाही. आत कोणीतरी बडी असामी आहे!’ साहेब : कोण रे? हवालदार : माहीत नाही साहेब, पण त्याने शाहरुख खानला ड्रायव्हर म्हणून ठेवले आहे.
No comments:
Post a Comment