Saturday, September 15, 2018

तालुकास्तरीय एकांकिका स्पर्धेत सनमडी शाळेचा प्रथम क्रमांक


जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय एकांकिका स्पर्धेत सनमडी (ता.जत) येथील  जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या एकांकिकेचा प्रथम क्रमांक आला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी  "संसार माझा फाटका पण करीन नेटका" ही एकांकिका सादर  केली.
या एकांकिकेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने सदर एकांकिकेची निवड जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.या एकांकिकेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती-प्राणिशा गुरव यांनी दिग्दर्शिका म्हणून काम पाहिले. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संजय कोळी,कथालेखक सुनिल गुरव, संवाद मार्गदर्शक दिलीप साळुंखे, वेशभूषा राकेश वसावे यांनी काम पाहिले.मुख्याध्यापक संतोष काटे,केंद्र प्रमुख-सुखदेव शिंदे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष तमन्ना कर्ले  यांचे मार्गदर्शन लाभले. नेताजी पवार, महादेव सलगर, शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. शिंदे, हिराचंद लमाण, तानाजी गवारे,गटशिक्षणाधिकारी-भाऊसाहेब जगधने यांनी  विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.


No comments:

Post a Comment