Tuesday, September 25, 2018

पंधरा मिनिटात चार्ज होणार आणि सहा तास चालणार


मोटोरोलाने भारतात आपला नवा स्मार्टफोन Motorola one power लाँच केला आहे. या फोनचे खास काही खास वैशिष्टे आहेत. ते म्हणजे या फोनला स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर,5000 एमएएच बॅटरी, 6.2 इअंच फुल एचडी डिस्प्ले,दोन रियर कॅमेरे आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइड वन कुटुंबाचा भाग आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कंपनीचा असा दावा आहे की, फक्त पंधरा मिनिटे चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी सहा तास चालते.
कंपनीने या फोनची किंमत 15 हजार 999 रुपये अशी निश्चित केली आहे. 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम या एकाच प्रकारात उपलब्ध आहे. याची विक्री फक्त फ्लिपकार्ट या ई-कॉमर्सवर 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र याची नोंदणी सुरू झाली आहे.
मोटोरोला वन पॉवरमध्ये 6.2 इंच फुल एचडी+एलसीडी मॅक्स विजन डिस्प्ले आहे, ज्याचा रेजोल्यूशन 1080 x 2246 पिक्सल आहे. कंपनीने या हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसरसोबत एड्रेनो 509 जीपीयू,4 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल मेमरी (256 जीबी सपोर्ट) आणि 5000 एमएएचची बॅटरी दिलेली आहे.
कॅमेर्याच्याबाबतीत सांगायचे तर Motorola one power मध्ये कंपनीने डुअल रियर कॅमेरा दिला आहे. प्रायमरी सेन्सर 16 मेगापिक्सलचा आहे आणि सेकेंडरी सेन्सर 5 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट पॅनेलवर 12 मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.



No comments:

Post a Comment