Monday, September 24, 2018

तुमच्या इंटरनेट डाटाचे रक्षण करणारा अ‍ॅप



जर तुम्ही वायफाय किंवा मोबाईल हॉट्स्पॉटचा वापर करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, तुमचा इंटरनेट डाटा आणखी कोणी वापर आहे, तर एक अ‍ॅप तुमचा रक्षक म्हणून काम करू शकतो. वाय-फाय इन्स्पेक्टर अ‍ॅप आणि वाप-फया किल अ‍ॅप त्याचबरोबर फिंग नेटवर्क टूल्स अ‍ॅप अशी काही नावे आहेत.त्यामुळे तुम्ही तुमचा इंटरनेट डाटा सुरक्षित ठेवू शकता.
वाय-फाय इन्स्पेक्टर अ‍ॅप
4.3 रेंटिंगचा हा अ‍ॅप आपल्याला मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपचा वापर करून ग्राहक त्यांच्या वाय-फाय राउटर किंवा हॉटस्पॉटवरून किती लोकांनी आपला डिवाइस कनेक्ट केला आहे, हे जाणून घेऊन शकतात. त्याचबरोबर त्या डिवाइसचे नाव आणि त्याम्चा मॅक अॅड्रेसदेखील त्यांना पाहायला मिळतोअ‍ॅप डेवलपरचा असा दावा आहे की, हे अॅप्लिकेशन सर्व माहिती अवघ्या तीस सेंकदात सांगण्यास सक्षम आहे. हे अॅप एंड्रॉइड 2.3 झिंजरब्रेड ऑपरेटिंग सिस्टिम किंवा त्याहीपेक्षा वरच्या वर्जनवर काम करतो. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर wifi inspector या नावाने उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वाय-फाय किल अ‍ॅप
 वाय-फाय किल अॅप्लिकेशन फक्त दुसर्यांना वाय-फाय हॉटस्पॉटशी जोडण्यास मज्जाव करण्यास मदत करत नाही तर तुम्ही एकाद्या सार्वजनिक वाय-फायचा वापर करत असाल तर त्याचा स्पीड वाढवण्याचा विकल्पदेखील देतो. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर free wifi kill reference या नावाने उपलब्ध आहे. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कमध्ये सुरक्षेसंबंधी काही धोके असतात. त्याचबरोबर तिथून डिवाइसमध्ये वायरस येण्याचाही धोका अधिक प्रमाणात असतो. जर तुमच्या आजूबाजूला काही लोक या पब्लोक वाय-फयाचा वापर करत असतील तर हे अ‍ॅप त्यांना डाटा चोरण्यापासून रोखू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाय-फाय किल फक्त रुट केलेल्या स्मार्टफोनसोबतच काम करतो.
फिंग नेटवर्क टूल्स अ‍ॅप
गुगल स्टोरवर उपलब्ध असलेला fing-network tools अ‍ॅपला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटमध्ये इंस्टॉल केल्यानंतर युजर ओळखू शकतो की, तुमच्या राउटरशी किती डिवाइस कनेक्ट आहेत. यात डिवाइसचा इतिहासदेखील पाहता येतो. त्याचबरोबर कोणता डिवाइस कधी वाय-फाय राउटरशी कनेक्ट झाला होता, याचीही माहिती आपल्याला काढता येते.



No comments:

Post a Comment