जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील गुगवाड येथे मटका अड्ड्यावर सांगली येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख 25 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
यात रोख एक लाख रुपये व तीन मोबाईल यांची किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी तीन संशयीत आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. संजय ऐवळे ,पुंडलिक मांग , मल्लिकार्जुन अंदानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघे संशयीत सिंकदर पठाण (रा. कुपवाड,सांगली) व अमित केरीपाळे (रा. जत) हे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
सांगलीच्या विशेष पोलीस पथकास गुगवाड येथे मटका अड्डा सुरू आसल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी ही कारवाई केली, या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार डी.एस कोळी हे करत आहेत.
No comments:
Post a Comment