Tuesday, September 18, 2018

रेशनकार्ड तातडीने द्या,अन्यथा उपोषण: आबासाहेब ऐवळे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सुमारे दोन हजार रेशनकार्डे तहसीलदार यांच्या सहीविना पडून आहेत. त्यामुळे अनेकांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. महसूल विभागाने तातडीने ही रेशन कार्डे लोकांना उपलब्ध करून द्यावीत,अन्यथा उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी दिला आहे.
  जत तालुक्यातील लोकांसाठी पंतप्रधान योजना, इंदिरा आवास योजना, वसंत घरकूल योजना आदी अनेक  योजनांच्या माध्यमातून  शासनाच्यावतीने  हजारो घरकुले  मंजूर  झाली आहेत. त्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत यांच्याकडून लाभार्थी यांना रेशनकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक लाभार्थी यांचे रेशन कार्ड नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सध्या जत पुरवठा विभागामध्ये पाचशे नवीन रेशन कार्ड तयार असून  त्यावर तहसीलदार यांच्या सही न झालेने जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचबरोबर जवळपास दीड-दोन हजार रेशनकार्ड सही विना पडून आहेत.  तहसीलदार सचिन पाटील यांनी तातडीने लक्ष घालून रेशन कार्डे दोन दिवसांत द्यावीत, अन्यथा सोमवार दिनांक 24 रोजी सकाळपासून  जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए गट) अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी दिला आहे.
 यावेळी उपस्थित बसव सेना प्रमुख बसवराज पाटील, मनसे अध्यक्ष मुकेश पवार, राजु ऐवळे,बाळासाहेब बुद्धसागर, सुखदेव ऐवळे, मनसे नेते कृष्णा कोळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment