महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक संघटना, निवारा कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी जत येथील तहसील कार्यालयावर आज (मंगळवार) महिला कामगार,मजुरांचा मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत जाहीर केल्यानुसार प्रत्येक बांधकाम कामगाराला घरासाठी दोन लाख रुपये अनुदान द्या,तसेच आशा कामगार व बांधकाम कामगारांना घरासाठी जमीन द्या, रेशन बंद करून रोख सबसिडी देण्याचा निर्णय रद्द करावा, या व अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होत्या. त्यांनी जत तालुक्यातील घर मागणीच्या आलेल्या 467 प्रस्तावांवर कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायतींकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी सर्वांना घरे मिळण्यासाठी सोमवार 24 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी जतमधील कामगार,मजूर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकर पुजारी. सुमन पुजारी. भीमा गाडीवडर . सुनीता कांबळे. श्रीमती कोळी, महादेव कांबळे. इक्बाल बोर्गी यांनी केले. यावेळी महिला मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रेशन बंद करणाऱ्या जीआरची होळी
जत शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत मोर्चा जत तहसील कार्यालयासमोर आला. यावेळी रेशन बंद करणाऱ्या महाराष्ट्र शासनच्या जीआरची होळी करण्यात आली व यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी 'मोदी हटाव, देश बचाव'च्याही घोषणा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment