Friday, September 21, 2018

येळवी हायस्कूल येथे हिंदी दिन साजरा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्र भाषा हिंदी दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणूनम्हाडाचे मुख्य अभियंता अनिल अंकलगी होते.
यावेळी श्री. अंकलगी यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देताना हिंदी भाषा ही संपूर्ण भारत नाही तर जगभरात समजण्यास सोपी व सहज संवाद साधता येणारी असल्याचे सांगितले. सध्या जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे,त्यानंतर चिनी भाषेचा क्रमांक लागतो. यावेळी हिंदी निबंधलेखन, सुलेखन,वक्तृत्व स्पर्धांचे प्रमाणपत्र व पारितोषिक विद्याथार्र्ंना प्रदान करण्यात आले. हिंदी विषयाचे शिक्षक श्री. खंडागळे यांनी हिंदी विषयाचे महत्व विषद केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. तेली होते. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment