‘ताणतणावाला’
तंदुरुस्तीएवढेच, कदाचित जास्त महत्त्व तरुणाईने दिले
पाहिजे. ताणतणावामुळे स्नायू, कांती, केस
व पचनसंस्था यांवर परिणाम होतो. म्हणून हिवाळ्यात गुलाबी थंडीत व्यायामशाळेत
जाण्याएवढेच एखाद्या सहलीला जाणे, मैदानी खेळ खेळणे, कुटुंबाबरोबर फार्महाऊसवर जाऊन वीकएंड मजेत घालवणे, यालापण
महत्त्व दिले पाहिजे. ‘मन ठीक तर तन ठीक’ अशी म्हण आहे. योगशास्त्रात आसनापेक्षा
मनाच्या व्यायामाला (यम, नियम) प्राधान्य दिले आहे. तुम्ही
स्वत: तंदुरुस्त आहात का? शारीरिक परीक्षा अजमावू शकता.
१) आपली छाती अडीच ते तीन इंच फुगली पाहिजे.
२) श्वास ४० ते ४५ सेकंद कोंडता (कुंभक) आला पाहिजे.
३) सतत (हमिंग) आवाज (ॐकार) तोंड बंद ठेवून २० ते २५ सेकंद काढता आला पाहिजे.
४) दर मिनिटाला १४ ते १६ वेळा श्वास घेतला गेला पाहिजे.
५) व्यायामामुळे लागलेली धाप/ दमछाक (श्वास) तीन मिनिटांत नॉर्मल झाली पाहिजे.
६) आपला व्यायाम शक्ती व क्षमतेप्रमाणे चालला आहे हे समजण्याचा सोपा मार्ग म्हणजे मित्राबरोबर दमछाक न होता बोलता आले पाहिजे.
७) आपल्या मनगटाजवळील नाडी बघणे सोपे असते. दर मिनिटाला ६० ते ८० ठोके पडले पाहिजेत. (आपल्या उजव्या हाताला पहिल्या तीन बोटाला)
८) शरीराचे तापमान ९८ ते ९८.५ फॅरेनाइट असावे. ते तपासावे.
९) दांडीला लोंबकळून, दोन हातांनी आपले शरीर एकदा तरी वर उचलता आले पाहिजे. (पुलप्स्)
१०) ५’-३’’ उंची असलेल्या स्त्रीचे वजन ५६ किलो, तर ५’-८’’ उंची असलेल्या पुरुषाचे वजन ६५ किलो भरले पाहिजे हे एका उदाहरण. पुढे साधारण दर इंचाला (पुढे मागे) २ किलो वजनाचा फरक असतो, तो पडला पाहिजे.
जीवनाच्या तिन्ही बाजू समप्रमाणात राहिल्या पाहिजेत. लांबी म्हणजे वय, रुंदी म्हणजे शरीरयष्टी आणि खोली म्हणजे स्वास्थ्य.

No comments:
Post a Comment