शाळा
: गणवेश, नीटनेटकेपणा.
कॉलेज
: कसाही अवतार आणि स्टाईल.
शाळा : पेन्सिल,
रबर, शार्पनर, पेन,
पट्टी.
कॉलेज : एक बॉलपेन ते
पण मित्राकडून घेतलेले.
शाळा : वर्गात येण्याआधी
‘बाई, मी आत येऊ का?‘
कॉलेज : वर्गाजवळ येणार,
किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.
शाळा
: सर्व विषयांची वह्या-पुस्तके स्वतः जवळ!
कॉलेज
: मित्राला म्हणणार, ‘अरे यार एक पेज तर दे ना‘.
शाळा
: पेपर लवकर लिहून झाला तर सर्व म्हणणार, ‘काय
हुशार आहे!’
कॉलेज : मित्र म्हणणार,
‘काही येत नाही त्याला म्हणून निघालाय.’
शाळा
: उशिरा आलात की शेवटच्या बाकावर बसावे लागते.
कॉलेज : उशिरा आलात की
पहिल्या बाकावर बसावे लागते.
शाळा
: व्यवस्थित पाठांतर.
कॉलेज
: नुसताच रट्टा.
शाळा : ‘यार,
मला ती आवडते.’
कॉलेज : ‘सांभाळून बघ
रे वहिनी आहे!’
*****
एक छानशी व्याख्या - लग्न म्हणजे ’अहो, ऐकता का’
यापासून _’बहिरे झाला आहात का?’ इथपर्यंतचा प्रवास !
काय गंमत
आहे. इंग्रजीत ज्याला ‘नर्व्हस‘
सिस्टीम म्हणतात, त्याला मराठीत ‘मज्जा‘ संस्था म्हणतात.
*****
पु ल देशपांडे : चहाचा
कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ... अवती भोवती पाहता पाहता
हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते..अरेच्या
! साखरच घालायला विसरलो की काय.... पुन्हा जाऊन
साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती,
कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर. आयुष्य
असच असतं. सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. एखाद्याशी
हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं
पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान-अपमान
मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता
आलं पाहिजे. जगाच्या या रंगमंचावर असे वावरा, की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जगातील सर्वात महाग पाणी कोणते, तर अश्रू कारण त्यात
एक टक्का पाणी आणि 99 टक्के भावना असतात.
*****
मास्तर : बंटी.
वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?
बंटी
: मी झाडामागे लपेन.
मास्तर
: अन् वाघाने तुला तिथे बघितले तर?
बंटी : मी झाडावर चढेन.
मास्तर : अन् वाघ झाडावर
पण चढला तर?
बंटी : मी नदीमध्ये उडी
मारेन.
मास्तर : अन् जर वाघाने
नदीमध्ये पण उडी मारली तर?
बंटी : मास्तर,
म्हणजे वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय?
*****
डॉक्टर : आता तुमच्या बायकोची
तब्बेत कशी आहे?
नवरा : बरं वाटतय तिला
आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय!
No comments:
Post a Comment