Monday, September 17, 2018

गुगवाड कन्नड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सिदमल्लया मठपती


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील गुगवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सिदमल्लया मठपती यांची तर उपाध्यक्षपदी शिवनिंग कोकणी यांची निवड झाली आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. यात या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मुरगेश कुमारमठ यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शाळेचा शैक्षणिक दर्जा, शासनाच्या शैक्षणिक योजना, शाळा व विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढीसाठी पालक व शिक्षकांची जबाबदारी यावर चर्चा झाली. यावेळी विठ्ठल बिरादार, महांतेश चौगुले, शंकर कांबळे, अब्दुल बाडकर, मीनाक्षी मठपती, पार्वती बिरादार, मंगल मठपती, संगीता कांबळे, अनिता यकंची, राजेंद्र पाटील यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment