Thursday, September 27, 2018

शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे तक्ते दोन दिवसांत: गाडेकर


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे तक्ते दोनच दिवसांमध्ये सर्व पंचायत समित्यांकडे पाठवण्यात येतील, असे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी शिक्षक संघाला दिले आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली.
सन 2017- 18 या आर्थिक वर्षा मधील भविष्य निर्वाह निधीचे तक्ते शिक्षकांना एप्रिलमध्ये मिळणे आवश्यक असताना काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप शिक्षकांना भविष्यनिर्वाह निधीचे तक्ते मिळाले नव्हते. त्यामुळे अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतून कर्ज काढण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासंबंधी सातत्याने शिक्षक संघाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, श्रीकांत पवार, शशिकांत माणगावे, सुधाकर पाटील, शामगोंडा पाटील, सुरेश खारकांडे उपस्थित होते. फंडाचे तक्ते मिळाल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असल्यास शिक्षकांनी 30 दिवसांच्या आत त्यासंबंधी तक्रार नोंदवावी, त्याबाबतची खात्री करून या तक्त्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल, अशीही माहिती श्री गाडेकर यांनी शिक्षक संघाला दिली.

No comments:

Post a Comment