जत,(प्रतिनिधी)-
जतच्या लायन्स व लायनेस क्लबच्यावतीने
देण्यात येणारे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार दि. 22 सप्टेंबर रोजी एका विशेष समारंभात राज्याचे सहकारमंत्री
आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत.
जत येथील विजापूर रोडवरील उमा नर्सिंग
कॉलेजच्या सभागृहात शनिवारी दि. 22 रोजी सकाळी
साडेनऊ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खासदार संजयकाका पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष
शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, सांगली
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील,
भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह डॉ.रवींद्र आरळी, गोपाल बजाज, रवींद्र
टिंगरे उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे आणि
लायनेस क्लबच्या अध्यक्षा सुरेखा पतंगे यांनी या पुरस्कार वितरण समारंभाला मोठ्या संख्येने
उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी
संदीप लोणी, श्रीमती संगीता आरबली,पूनम
लोणी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment