लहानपणी शाळेमधे एकच ड्रेस असायचा...
खाकी चड्डी
पांढरा सदरा प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा...
पायात
चप्पल असणं ही लक्झरी असायची...
गावात
एखाद्या कडेच ‘बाटाची‘चप्पल दिसायची!
रेशनच्या दुकानावर लोकं चकरा मारायचे...
तेव्हा कुठं वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे !
वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे शुभंकरोती
आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे !
सडा,
सारवण, धुणं, भांडी...
बायकांना तर आरामच नव्हता ज्याच्याकडे
’ पाणी
तापवायचा बंब ’तोच सगळ्यात श्रीमंत होता !
दिवाळीच्या
फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं खोबर्याच्या तेलामधे वासाचं तेल
असायचं !
कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली माया, प्रेम एवढं होतं की गोड लागायची वातड चकली !
भात, पोळी, गोडधोड सणासुदिलाच व्हायचे पाहुण्याला गरम
आणि घरच्याला
गार पोळी वाढायचे!
पिझ्झा, बर्गर,
न्यूडल्स आजकाल रूटीन असतं
गरिबीला लपवणं फारच कठिण असतं
स्वयंपाक
घरात आता भरपूर किराणा भरलेला असतो
खाऊ घालायची
वासनाच नाही म्हणून लोणच्याला भुरा येतो?
हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठ्ठं असतं
दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर ‘भकास‘ वाटतं ?
का बरे पहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?
काय तर म्हणे आम्ही आता हाय फाय झालो !
चार पैसे आल्यामुळे, खरंतर सगळेच पुरते वाया गेलो !
कशामुळे
घात झाला काहीच का कळंत नाही ?
एवढं मात्र खरं की पहिल्यासारखं सुख आता अजिबात मिळत
नाही
?
प्रगती झाली की अधोगती ?
काहीच उमजेना ?
माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना ?
अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटलेत अन्
आधार गमावल्यामुळें ‘सायकियाट्रिक‘ जवळचे झालेत !
भ्रमामध्ये राहु नका जागं व्हा थोडं माणसा शिवाय
माणसाचं सुटत नसतं कोडं!
जीवनात
दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत...
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!
*****
खूप गोंधळ झाला जेव्हा...
बायोलॉजीच्या
शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे ’शरीरातील
पेशी’
फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे ’बॅटरी’,
इकॉनॉमिक्सच्या
शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे ’विक्री’,
हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे ’जेल’,
इंग्रजीच्या
शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे ’मोबाइल’,
आणि खरं म्हणजे जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजे ’डिस्काउंट’!
*****
जो पर्यंत आयुष्य आहे
..... रोज डी पी बदला! नंतर तर एकाच फोटोमध्ये
लटकून रहायचे आहे. तोही पोरांनी लावला तर!
No comments:
Post a Comment