जत,(प्रतिनिधी)-
ऊसतोड कामगारांच्यासाठी घोषित केलेल्या महामंडळाचे
कामकाज दसर्या पुर्वी सुरू करुन येत्या हंगामापासून त्याचे
लाभ कामगारांना देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.नुकतीच मुंबईतील वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रातील ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनांच्या
शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी
मुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या निर्मितीचे आश्वासन दिले आहे.
यावेळी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री
फडणवीस यांचे बरोबर ऊसतोड कामगारांच्या विविध न्याय मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या.
महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा डॉ सुभाष
जाधव यांनी आधीच महामंडळाच्या अंमलबजावणीस उशीर झाला असल्याचे सांगून येत्या हंगाम
ापासून त्याचे लाभ मिळाले पाहिजेत असे सांगितले. त्यासाठी सरकारने
पुरेशी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे व त्याअंतर्गत
14 प्रकारचे लाभ कामगारांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा आबासाहेब चौगले, सय्यद रज्जाक, मारोती खंदारे आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी
उपस्थित होते. तत्पूर्वी राज्य साखर कारखाना संघाच्या मुंबई येथील
कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या राज्य व्यापी संपाच्या पार्श्वभूमी वर दु 12 वाजता कामगार संघटना बरोबर संघाच्या पदाधिकार्यांनी बैठक घेतली. त्यावेळी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक
कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोडणी व वाहतूक दरवाढीचा करार येत्या हंगामापुर्वी करण्याची
मागणी केली. ऊसतोडणी दर प्रती टन 378 रुपये
करा, ऊस वाहतुकीच्या दरात 40 टक्के वाढ
करण्यात करा, कमिशन 20 टक्के करा,
प्रत्येकी 5 लाखांचा अपघात विमा करा आणि प्राव्हिडंड
फंडाची व माथाडी बोर्डाची अंमलबजावणी करा आदी मागण्या करण्यात आल्या. त्या विषयी तसेच अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. साखर
संघाचे वतीने नविन दरवाढीचा करार करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल तसेच 27 सप्टेंबर रोजी साखर संघाच्या संचालक
मंडळाच्या बैठकीत अंतिम विचार विनिमय करुन तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment