आता अनेक कंपन्यांनी ड्युल कॅमेरा स्मार्टफोन
बाजाराता आणले आहेत. स्लीम फोन असल्याने
कॅमेरा मॉड्यूल लहान असतो. लहान मॉड्यूलमध्ये कंपनीला मल्टीपल
लेन्सेज एलिमेंटस, इमेज सेंसर आणि कधी ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशनसाठी
छोटे छोटे मोटर्स फिट करावे लागतात. ड्यूलसाठी दोन लेन्सेस आपल्याला
दिसतील. यांना एकाचवेळी होरिजेंटल किंवा वर्टिकल लावलेलं असतं.
याचा अर्थ असा की, डिव्हाइसमध्ये दोन पूर्ण आणि
स्वतंत्र कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध असतात.यातला एक प्रायमरी लेन्स
आहे, ती लेन्स संपूर्ण मुख्य काम करते. तर दुसरी लेन्स अतिरिक्त प्रकाश कॅप्चर करणे,फिल्ड ऑफ
व्यू वाढवणे आणि बॅकग्राऊंड ब्लरला मदत करणे आदी कामे करते.
अर्थात ड्यूल कॅमेरा सिस्टम शानदार रिजल्ट्स
ऑफर करतो, शिवाय काही अन्य फॅक्टर्स जसं की, सेन्सरचा आकार,पिक्सलचा आकार, अपरेचर
आणि पोस्ट प्रोसेसिंगमध्येदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. ॠॅमसंग गॅलेक्सी एस 7, गुगल पिक्सल, वन प्लस 3, एलजी जी 5,एचटीसी
10 आणि काही अन्य फोन्स काही ड्य्प्पल कॅमेरा स्मार्टफोन्सच्या तुलनेत
कमी प्रकाशातदेखील शानदार क्वालिटी देतात. शिवाय चांगले डिटेल्सदेखील
देतात. या फोन्सशी सामना आयफोन 7 प्ल्स
आणि हुवई पी 9 सारखे ड्यूल कॅमेरा स्मार्टफोन्स करू शकतात.
ड्यूल कॅमेरा पहिल्यांदा 2011 मध्ये एचटीसी इवो 3डी स्मार्टफोनमध्ये
लॉन्च झाला होता. त्यावेळेला ड्यूल कॅमेरा एचटीसीच्या
3 डी स्क्रीनसोबत काम करण्यासाठी 3 डी इमेज कॅप्चर
करायला त्याचा वापर केला जात होता. 2014 मध्ये एचटीसी वन एम
8 आपल्या ड्यूओ कॅमेरा सेटअप आणि प्रभावी डेफ्थ ऑफ फिल्ड इफेक्टसोबत
आला. आता या ड्यूल कॅमेर्याचा फायदा काय?
असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण तो आपल्याला अधिकडिटेल्ससह शॉर्प इमेज देतो. हा अल्ट्रा
वाइड एंगल मोड इनेबल करतो. हा सब्जेक्टला फोकस करण्यासाठी डेफ्थ
ऑफ फिल्डसोबत फोटो घेतो. ड्यूल कॅमेरा सेटअप फोनमध्ये
1 एक्स किंवा 2 एक्स ऑफ्टिकल झूम जोडतो.
2015 मध्ये लेनोवो कंपनीने वाइब एस1मध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा लॉन्च केला होता. विवोनेसुद्धा
विवो वी5 प्ल्समध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा लॉन्च केला होता.
यात चांगले डेफ्थ ऑफ फिल्ड इफेक्टसाठी बोकेह इफेक्ट होते. हे फोन खासकरून अशा युजर्ससाठी होते,जे आपल्या आवडीनुसार
अपरेचर एडजस्ट करू इच्छित होते.
No comments:
Post a Comment