जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सोन्याळ येथील अपंगांना
पंचायत समितीच्या सदस्या श्रीदेवी जावीर यांच्या प्रयत्नातून तीन चाकी सायकली मंजूर
झाल्या. त्यांचे वाटप जि.प. चे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांच्याहस्ते
करण्यात आले.
सोन्याळ येथील ग्रामपंचायतीसमोर समारंभपूर्वक
या तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी
श्री. रवी-पाटील म्हणाले की, इतरांना मदत करणे ही आपली संस्कृती असून गरजूंना आपल्या कमाईतील थोडा हिस्सा
द्यावा आणि त्यांचे जीवन सुकर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment