Monday, September 17, 2018

युवक काँग्रेस अध्यक्षपदी विकास माने


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विकास माने यांची तर उपाध्यक्षपदी गणी मुल्ला यांची निवड झाली. जत येथील बचत भवन सभागृहात यासाठी निवडणूक पार पडली. प्रतिस्पर्धकांवर मात करत त्यांनी विजय हासिल केला.
निवडीनंतर बोलताना श्री. माने आणि श्री. मुल्ला म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू आणि काँग्रेस मजबूत करू. यावेळी जत तालुक्याचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार, जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, आप्पासाहेब मासाळ, माजी नगराध्यक्ष इकबाल गवंडी,, भैय्या कुलकर्णी, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल काळे, योगेश बामणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment