Thursday, September 20, 2018

शिक्षक बदल्याबाबत लवकरच कार्यवाही : डॉ. दीपक म्हैसकर


जत,(प्रतिनिधी)-
ऑनलाईन बदल्यांमधील त्रुटींबाबत शिक्षकांनी केलेल्या तक्रारींवर घेण्यात आलेल्या सुनावणीनंतर प्राथमिक शिक्षक बदल्यांबाबत पुढील कार्यवाही येत्या पंधरवड्यात करणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्याचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन परिपत्रकान्वये मे 2018 मध्ये करण्यात आल्या. या बदल्यामध्ये अनेक त्रुटी राहील्या असल्याचे शिक्षक समितीने निदर्शनास आणून दिले. शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारचे लक्ष वेधल्याने शिक्षकांच्या तक्रारअर्जावरुन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे 25 ते 27 जुलै दरम्यान जिल्ह्यातील शिक्षकांचे जबाब सहाय्यक आयुक्त विलास जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात नोंदवून घेतले. याला दोन महिन्यांचा कार्यकाल होत असल्याने याबाबत लवकर कार्यवाही करून बदलीचे दुरुस्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक समितीचे नेते नाना जोशी, कार्याध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत, राजीव खंदारे यांनी आयुक्तांना केली.
बदल्याचे आदेश आणि उर्वरित बदल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांना याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी कळवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणे येथे जबाब दिलेल्या शिक्षकांना न्या मिळेल असे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment