Saturday, September 29, 2018

इंधन दरवाढीवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
देशात पेट्रोल दरवाढीने १.३0 कोटी जनतेची होरपळ केल्याचे दिसून येत आहे. देश विकासाच्या मार्गाकडे जात असताना आज पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पेट्रोलने किमतीची हद्दपार केल्याचे दिसून येते. संपूर्ण जगाच्या पाठीवर पेट्रोल सर्वात जास्त महाग असेल तर भारतात. त्यामुळे भारतात हे चाललय तरी काय, असा सवाल उपस्थित होत असून महागाई वाढत चालली आहे. इंधन दरवाढीवर नियंत्रण न आणल्यास महागाईबरोबरच जनक्षोभ वाढल्याशिवाय राहणार नाही.
 एका माहितीनुसार भारतातून १५ देशामध्ये ३४ रुपये लिटरच्या दराने पेट्रोल निर्यात केले जाते. व रिफाईंड डिझेल २९ देशांमध्ये ३७ रुपये दराने निर्यात केले जाते. श्रीलंकेमध्ये ४६ रुपये दराने पेट्रोल विकते. श्रीलंकेला ४६ रुपये लिटर दराने विकणे परवडते मग भारतात ८७.0४ रुपये लिटर पेट्रोल का? हा मोठा जटील प्रश्न आहे. जगाच्या पाठीवर मागासलेल्या देशांमध्ये एवढे महाग पेट्रोल नाही. तेवढे पेट्रोल आज भारतात महाग आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानसारख्या देशात ३७ ते ४0 रुये लिटर पेट्रोल विकल्या जाते मग भारतात का नाही? जगात कच्चा तेलाच्या किंमती मोठय़ा प्रमाणात घसरल्यानंतरसुद्धा भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती आभाळाला टेकल्या आहे.
देशात महागाई मोठय़ा प्रमाणात वाढायला कारणीभूत पेट्रोल व डिझेलच्या किंमती आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर जर सरकारने नियंत्रण आणले तर महागाई अपोआप कमी होऊ शकते, यात दुमत नाही. अनेक शहरात रस्त्यांचे, मेट्रोंचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची हालत अत्यंत खराब झाल्याचे दिसून येते. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर देशतील जिवनावश्यक वस्तुंची उलाढाल होत असते. बस प्रवास, रेल्वे प्रवास किंवा कोणताही प्रवास महागडा होत आहे. त्यामुळे मालभाडे वाढून महागाईवर परिणाम होत आहे. सरकारने ताबडतोब पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. याला जीएसटीमध्ये आणण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे देश सुरक्षेवर नियंत्रण ठेवून आहे त्याच प्रमाणे पेट्रोल व डिझेलवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.

No comments:

Post a Comment