जत,(प्रतिनिधी)-
येळवी येथील ओंकारस्वरुपा फौंडेशन व भारती हाॅस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने येळवी येथे सोमवारी 17 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात दंत चिकित्सा, अस्थिरोग, बालरोग, कान-नाक-घसा, नेत्रचिकित्सा व जनरल उपचार या क्षेत्रातील तज्ञ डाॅक्टर उपस्थित राहून मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार करणार आहेत. याचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
येळवीचा राजा ओंकार स्वरुपा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सदर शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवार 18 रोजी पॅन कार्ड, आधार कार्ड,(नावात बदल),जन्म तारीख, मतदान कार्ड, व रेशन कार्ड मध्ये नावाची नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे.
शिबीरामध्ये शासकीय अधिकारी यांच्याकडून संजय गांधी योजना , श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ योजना (केंद्र शासन) , राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य अनुदान योजना , आम आदमी विमा योजना, व बांधकाम कल्याण कामगार या योजनाविषयीची माहिती या शिबिरामध्ये देऊन, योजनेच्या संबंधित व्यक्तीला त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
तरी ज्या व्यक्तीना खालील योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या व्यक्तीने कागदपत्रे घेऊन येळवी ग्रामपंचायत जवळ उपस्थित राहण्याचे आवाहन दिपकआण्णा अंकलगी (मंडळ, अध्यक्ष), संतोष पाटील (सचिव) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment