जतच्या लायन्स व लायनेस क्लबच्यावतीने देण्यात येणारे लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून येत्या शनिवारी दि. 22 सप्टेंबर रोजी एका विशेष समारंभात राज्याचे सहकारमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत.
घन:शाम चौगुले (एम.व्ही.हायस्कूल,उमदी),धानाप्पा बाजी(कन्नड प्राथमिक शाळा,जाडरबोबलाद),बालाजी पडलवार (मोटेवाडी),कुमार इटेकर (गुरुबसव हायस्कूल,संख), सुनील सूर्यवंशी (साळमळगेवाडी),सतीश वाघमारे (जिरग्याळ), मुबारक मुल्ला (बालविद्यामंदिर,जत),मलकारी होनमोरे ( कन्नड शाळा,बोऱ्याळवस्ती-संख),जयंत गेजगे(दरिबडची),श्रीमती शोभा खैराव(कन्नड शाळा,संख),प्रकाश माळी(कुलाळवाडी),श्रीमती रेणू गायकवाड (म्हैसाळ-मिरज) या शिक्षकांना यंदाचा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.जत येथील विजापूर रोडवरील उमा नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात शनिवारी दि. 22 रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खासदार संजयकाका पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह डॉ.रवींद्र आरळी, गोपाल बजाज, रवींद्र टिंगरे उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे आणि लायनेस क्लबच्या अध्यक्षा सुरेखा पतंगे यांनी या पुरस्कार वितरण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी संदीप लोणी, श्रीमती संगीता आरबली,पूनम लोणी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment