सांगली,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या माध्यमातून सोयाबीन, मूग व उडीद खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खरेदी संस्थांकडून
अर्ज मागवण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ
(नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात
सोयाबीन, उडीद व मुगाचे उत्पादन सुरू झाले आहे. परंतु हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे
तक्रारी येऊ लागल्या आहेत. केवळ सोयाबीनला हमीभावापेक्षा शंभर
रुपये जादा दर मिळत आहे. उडीद आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर
मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक
फटका बसत आहे. शेतकर्यांना हमीभाव मिळावा
यासाठी मार्केट यार्डात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी नुकतीच बाजार समितीने जिल्हाधिकारी
यांच्याकडे केली आहे. ’नाफेड’मार्फत मुग,
उडीद आणि सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग
अधिकार्यांनी खरेदी संस्थांना आवाहन केले आहे. खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा किंवा तालुका स्तरावरील ’अ’ वर्ग सभासद खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था यांना प्राधान्य दिले जाईल.
तसेच अ वर्ग सभासद संस्था नसतील तर इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद
करून घेऊन खरेदीचे काम दिले जाईल. फार्मर प्रोड्युसर कंपनीला
त्यानंतर प्राधान्यक्रम राहील. खरेदी संस्था निवडीसाठी संस्थांना
साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला
आवश्यक असेल. तसेच संस्थेचे स्वत:चे किंवा
भाड्याचे गोदाम, खरेदी- विक्रीचा एक वर्षाचा
अनुभव, सेवकवर्ग असल्याबाबतचे प्रमाणपत्रासह इतर निकष पूर्ण करावे
लागतील. जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडूनही केंद्र सुरू करण्याबाबत
नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक केले आहे.
No comments:
Post a Comment