Saturday, September 15, 2018

तालुकास्तरीय एकांकिका स्पर्धा उत्साहात पार

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय  एकांकिका स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या. याला मोठा प्रतिसाद मिळाला.जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धा 1 ली ते 5  वी आणि 6 वी ते 8 वी अशा दोन गटात घेण्यात आल्या. 1 ली ते 5 वी या गटात पहिला क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 च्या संघाने एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वीतीय क्रमांक जिरग्याळ येथील जिल्हा परिषद शाळेने तर तृतीय क्रमांक डफळापूर   क्रमांक 1 या शाळेच्या संघाने पटकावला.
6 वी ते 8 वी गटात पहिला क्रमांक सनमडी केंद्र शाळेने तर द्वितीय क्रमांक जिरग्याळ आणि तृतीय क्रमांक कंठी येथील  जि.प.शाळेच्या संघाने पटकावला.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. शिंदे, तानाजी गवारी, केंद्रप्रमुख संभाजी कोडग आदींनी प्रयत्न व मार्गदर्शन केले.

श्री.सोलंकर( जत कन्नड), सुभाष शिदे (जत हायस्कूल, जत),श्री. कोळी (साळमळगेवाडी), श्री. चौरे (केंद्रप्रमुख) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment