जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक लवकरच केली जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी दिली.
आंतरजिल्हा बदलीने सांगली जिल्हा परिषदेकडे हजर झालेल्या शिक्षकांचे सांगली जिल्हा परिषदेत हजर झालेल्या कालावधीचा पगार लवकरच काढला जाईल.तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांच्या अंशदान कपाती रक्कमा फंड खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
विषय शिक्षकांना 4300 ग्रेड पे वेतनश्रेणी तात्काळ मिळावी. शिक्षकांनी घेतलेल्या हरकतींनुसार विषय शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अचूक तयार करण्यात यावी.पात्रपदवीधर शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिक्षकांना फंडाच्या स्लिपा (तक्ते) आठ दिवसात मिळतील, असेही सांगण्यात आले. फंडाच्या स्लिपा तयार करण्यासाठी नविन साँफ्टवेअर आले आहे.त्यामध्ये माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.ते काम आठ दिवसात पूर्ण होईल.त्यानंतर तात्काळ फंडाच्या स्लिपा शिक्षकांच्या हातात मिळतील.
यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,कृष्णा पोळ,अशोक कोळेकर,चंद्रशेखर क्षीरसागर,दिंगबर सावंत,नंदकुमार पाटील,विजय जाधव,बाळासाहेब सोलनकर,अविनाश सुतार,संकपाळ, विनोद कांबळे, कादर अत्तार, प्रकाश चव्हाण, दीपक काळे,दादासाहेब खोत, अशोक कोळेकर,उदयकुमार रकटे,महेशकुमार चौगुले, कुमार परीट,संजय पिंजारी,पोपट निकम,बाळासाहेब सोलनकर ,सागर पाटील ,शौकत नदाफ,दयानंद रजपुत,भाऊसो महानोर, सुधाकर वसगडे, बजरंग विरभद्रे,लक्ष्मण गायकवाड,दादासाहेब महाडिक, बालाजी मस्के, बी.एन.पवार ,संभाजी खोत,एकनाथ जाधव,दिलीप भोसले,प्रताप पाटील,अशोक काळे,महेंद्र माने,सर्जेराव शिंदे,चंद्रकांत गवळी,विजय महिंद आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment