Friday, September 28, 2018

उपविभागीय वादविवाद स्पर्धेत के.एम.हायस्कूल द्वितीय


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा पोलिस दल आणि उपविभागीय निर्भया पथक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जत,उमदी व कवठेमहांकाळ या उपविभागीय वादविवाद स्पर्धेत के.एम. हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
महिलांवरील अत्याचार कायद्याने की समाजप्रबोधनाने थांबतील या विषयावर जत, उमदी आणि कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याअंतर्गत या वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या विभागातून तीन-तीन विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या नऊ संघांमध्ये जत येथे जत व कवठेमहांकाळ उपविभागीय स्तरावर  पुन्हा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जत येथील के.एम. हायस्कूलच्या कु. प्रतीक्षा भोसले आणि ऋतिक रवींद्र कांबळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना निलेश तुराई,मुख्याध्यापक रियाज सय्यद आणि अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पोलिस निरीक्षक राजू तासिलदार,डॉ. रवींद्र आरळी, प्रभाकर जाधव,बी. एन. जगधने यांच्या उपस्थित बक्षीस देऊन गौरवण्यात आले.



No comments:

Post a Comment