Monday, September 17, 2018

Time please:प्रत्येकाला एक बहीण असावी.


प्रत्येकाला एक बहीण असावी. मोठी-लहान, शांत-खोडकर, कशीही असावी पण एक बहीण असावी. मोठी असेल तर आई-बाबांपासून वाचवणारी, लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी. मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाकिटात पैसे ठेवणारी. लहान असल्यास गुपचूप काढून घेणारी. लहान असो वा मोठी, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी भांडणारी. एक बहीण प्रत्येकाला असावी. मोठी असेल तर चुकल्यावर आपले कान ओढणारी. लहान असेल तिचे चुकल्यावरसॉरी दादाम्हणणारी. लहान असो वा मोठी, आपल्याला एक बहीण असावी. आपल्या एखाद्या मैत्रिणीलावहिनीम्हणून हाक मारणारी एक बहीण प्रत्येकाला असावी. मोठी असेल तर प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी, लहान असेल तर प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चाट लावणारी. ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी. एक बहीण प्रत्येकाला असावी. स्वतःपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करणारी, एक बहीण प्रत्येकाला असावी !
आई म्हणजे मैत्रीण गोड
आई म्हणजे मायेची ओढ
आई म्हणजे प्रेमाची बाहुली आई म्हणजे दयेची सावली
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा
आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी
 आई म्हणजे जीवाचे रान करून आपल्यासाठी राबणारी
 आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी प्रसंगी आपल्या चांगल्यासाठी
 रागवणारी बोट धरून चालायला शिकवणारी आपले अस्तित्व घडवणारी !
*****
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते... काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच......!
 पोलिसाने एका हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराला थांबवले आणि लगेच त्याच्या गाड़ीची चावी काढून घेतली. पोलीस म्हणाला, ’ये माझ्या मागे-मागे.’ दुचाकीस्वाराने लगेच खिशातून दुसरी चावी काढली. गाड़ी सुरू केली आणि म्हणाला, ’आता, तू ये माझ्या मागे!’

No comments:

Post a Comment