सांगली
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जत तालुक्यातील येळवी,कोंतेबोबलाद,येळवी आणि उमदी या चार गावांमध्ये मोफत नेत्र
तपासणी शिबीर आयोजित केले असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी केले.
जत तालुक्यात कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास
येथील रुग्णांना दूर जावे लागते. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
जत तालुक्यात याची सोय केली जात आहे. आरोग्य विभागाच्यावतीने
अनेक ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. आता
जत तालुक्यातील येळवी, कोंतेवबोबलाद 18 सप्टेंबर, उमदी 19 सप्टेंबर या
दिवशी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले असून या शिबिरांमध्ये मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी
संदर्भ सेवा, गरजू रुग्णांना मोफत चष्मे यात येणार आहेत.
या शिबिरासाठी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते व जत पंचायत समितीच्या
सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार
आहे.
No comments:
Post a Comment