Friday, September 28, 2018

ब्राम्हण तरुणांनी उद्योगांकडे वळावे:शेखर चरेगावकर

जत,(प्रतिनिधी)-
ब्राम्हण तरुणांनी न्यूनगंड काढून टाकून तसेच नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्याकडे वळावे,असे आवाहन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जत येथे बोलताना केले.त्यांचा येथील ब्राम्हण सभेच्यावतीने येथे सत्कार करण्यात आला.
श्री. चरेगावकर म्हणाले,समाजापुढे कितीही समस्या असल्या तरी मेहनत ही करावीच लागते. यश,अपयश या गोष्टी निष्ठा आणि मेहनतीवर अवलंबून असते. आपल्याकडील कौशल्याची ताकद वाढवायची गरज आहे. चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर चांगला व्यवसाय उभा करू शकतो. बदलाबरोबर जाण्याची तयारी ठेवावी. छोटे-मोठे उद्योगधंदे उभारून स्वबळावर उभे रहा.
कराड ब्राम्हण समाजाच्या अध्यक्षा स्नेहल भोसेकर म्हणाल्या,ब्राम्हण समाज संघटंनानी एकत्र आले पाहिजे. परिवर्तन महिलांपासून सुरुवात होत असल्याने समाजाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग असावा.पुण्यात होणाऱ्या ब्रम्हो उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी यांनी केले. श्रीपाद अष्टेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शंकर पाठक यांच्याहस्ते चरेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदीप कुलकर्णी यांनी मानले.यावेळी प्रदीप जेऊरकर, अनिल देशपांडे,अमित कुलकर्णी,प्रफूल्ल पाठक,संजय कुलकर्णी,माधव पाठक,प्रवीण अलबाळ,रमेश वाळवेकर, बी.के. कुलकर्णी, सौ.मीरा कुलकर्णी, सौ.दया कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, आशा कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment