जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आवंढी गावात दारूबंदी
होण्यासाठी आता मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. उत्पादन शुल्कचे विभागीय अधिकारी आनंद पवार यांनी आवंढीच्या
आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन तसा त्यांच्याजवळ प्रस्ताव ठेवला आहे. सनदशीर मार्गाने दारूबंदीचा विषय हाताळण्याबाबत त्यांनी महिलांचे प्रबोधन केले.
आवंढीत दारूबंदी व्हावी,यासाठी गावातील महिला जत येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास
बसल्या होत्या. सायंकाळी उत्पादन शुल्कचे अधिकारी श्री.पवार यांनी महिलांची भेट घेऊन प्रशासनाची बाजू समजावून सांगितली. त्यानंतर महिलांनी उपोषण सोडले. गावातील बेकायदा चालणारे
दारू अड्डे,मटका, गांजा, शिंदी अड्डे बंद करण्यासाठी म्हणून महिलांनी दारू बंदी समितीची स्थापना केली
होती.त्यानुसार बुधवारपासून उपोषणास सुरुवात केली. मात्र सायंकाळी श्री.पवार यांनी दारूबंदीचा प्रस्ताव
जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा लागेल. व त्यासाठी मतदान
प्रक्रिया राबवावी लागेल. कायदेशीर मार्गाने तयारी करावी लागेल.
यासाठी आम्ही तुम्हाला मदत आणि मार्गदर्शन करू, असे आश्वासन दिले. नंतर महिलांनी
उपोषण सोडले.
या आंदोलनात संगीता कोडग, रतन कोडग, प्रतिभा कोडग,
कांचन कोडग, अर्चना कोडग, मनीषा कुंभार, नंदाबाई देशमुख, शालन कोडग, रत्नप्रभा कोडग, अनुसया
तोरणे, सुनीता वाघमारे,सखुबाई कोडग आदींनी
सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment