जत,(प्रतिनिधी)-
अनेक वर्षे रेंगाळलेल्या भाजीमंडईचा
प्रश्न आता सुटला असून हा भाजीपाला विक्रीचा बाजार जत वाचनालयाजवळील
थोरल्या वेशीत भरणार आहे. या बाजारासाठी सत्ताधारी सर्वच पक्षाच्या
नगरसेवकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे स्टेट बँक,
तेली गल्ली या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
थोरल्या वेशीतील भाजीमंडईच्या कामाचा
शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष
आप्पा पवार, मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्याहस्ते करण्यात
आला. येत्या तीन महिन्यात काम पूर्ण करून भाजीमंडई याठिकाणी हलवण्यात
येईल, असेही सौ. बन्नेनवर म्हणाल्या.
यावेळी इकबाल गवंडी,श्रीकांत शिंदे, भूपेंद्र कांबळे, टीमू एडके, सुजय
शिंदे,स्वप्निल शिंदे, प्रवीण जाधव,
अरुण साळे, निलेश बामणे, नामदेव काळे, अनिल कोळी या नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी
उपस्थित होते.
सध्या भाजीमंडई स्टेट बँक,जयहिंद चौक, तेली गल्ली,
निलसागर लॉज, मारुती मंदिर, लोखंडी पूल, अशा संपूर्ण बाजारपेठेत भरत आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. भाजीमंडईसाठी
पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.पण यासाठी पर्यायी जागांवर सहमती होत नव्हती.मात्र सत्ताधारी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने या जागेसाठी मंजुरी
देऊन कामालाही सुरुवात केली आहे. यामुळे मंगळवार पेठ,
जयहिंद चौक मोकळा श्वास घेण्यास सज्ज झाला आहे.
No comments:
Post a Comment