Wednesday, September 26, 2018

ऑनलाईन औषधविक्री धोरणाच्या विरोधात 28 ला केमिस्ट दुकाने बंद


जत,(प्रतिनिधी)-
 केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषधविक्री धोरणाच्या विरोधात शुक्रवार, दि. 28 रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात सांगली जिल्हा केमि स्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सांगली जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद राहणार आहेत.
 ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या देशातील कमिस्ट्स आणि वितरकांच्या सर्वांत मोठ्या कंपनीने ऑनलाीन औषधविक्री आणि ई- फार्मसिज्ला विरोध केला आहे. देशव्यापी औषधविक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी याबाबत देशव्यापी लढा सुरु केला आहे. ऑनलाईन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करीत आहेत, तरीही अधिकार्यांनी ऑनलाईन औषधविक्री करणार्या कंपन्यांवर कारवाई केली नाही. ऑनलाईन कंपन्या एमटीपी किटस्, सिंल्डेनफिल, कोडेल सारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता विकण्यात आली आहेत, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यासारख्या विशेषीकृत डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच देणे गरजेचे असताना औषधे थेट किंवा अपात्र व्यावसायिकाच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहेत.
 औषध कमिशन मिळवण्यासाठी रुग्णांची तपासणी न करता बनावटी ई-प्रीस्क्रिप्शन निर्माण करणे, ऑनलाईन कंपन्या औषध कायद्याच्या कलम 18() च्या तरतुदीचे उल्लंघन करत उघडपणे प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करतात. त्यामुळे भारतातील सर्व केमिस्टच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी केमिस्ट संघटनेने शुक्रवारी बंद पुकारला आहे. पैसे खाणार्यांची लॉबी औषधांच्या ऑनलाईन विक्रीला अधिक प्राधान्य देत असतील. जगात आता औषधांच्या ऑनलाईन विक्रीला मंजुरी दिलेले प्रगत आणि कडक नियम असलेले देश; तसेच ऑनलाईन विक्रीला वाव दिलेले देश आता पुन्हा एकदा यावर निर्बध आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनधिकृत वेब पोर्टल्स औषधांच्या ऑनलाईन विक्रीसंदर्भात गैरवापर करत असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment