Saturday, September 22, 2018

माडग्याळ ग्रामीण रूग्णालयाचे उद्घाटन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालय व अधिकारी-कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच सहकार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. या इमारतींचे उदघाटन बरीच वर्षे रखडलेले होते.
यावेळी आमदार विलासराव जगताप, भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी, सभापती तम्मानगौडा रवी-पाटील, सरपंच आप्पूजत्ती,उपसरपंच मल्लू धुमाळे, सरदार पाटील, सुनील पवार, प्रभाकर जाधव, विठ्ठल निकम, विष्णू चव्हाण, परशुराम बंडगर, सोमन्ना हाक्के, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सचिन पाटील, डॉ. शेखर हिट्टी, डॉ. गडदे, सोन्याळ सरपंच सौ.संगीता निवर्गी, जाडरबोबलाद उपसरपंच प्रकाश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. माडग्याळ येथे बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय आणि अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतींसाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आमदार विलासराव जगताप म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात जनतेची चांगली सेवा देण्यातच घालवली आहे. या चार वर्षात अनेक विकास कामे केली आहेत. माडग्याळ हे मध्यवर्ती ठिकाण असून आठवडा बाजार मोठा भरतो व मार्केट कमिटीचा ही बाजार भरतो. ग्रामीण रुग्णालयमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सोय होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चनबसू चौगुले व आभार राजू कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment