जत,(प्रतिनिधी)-
जुनी पेन्शनसाठी शिक्षक बांधवांसह अन्य विभागातील कर्मचारी 1 आणि 2 ओक्टोबर रोजी आंदोलन करीत आहे. या लोकांना जुनी पेन्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांसह अन्य शासकीय कर्मचारी वर्गांनी या प्रकरणी 2 ऑक्टोबर रोजी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'शिक्षक भारती' दिगंबर सावंत यांनी केले आहे.1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचारी यांना शासनाने परीभाषिक अंशदान पेन्शन योजना / राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केली आहे.मात्र ही योजना सरकारी कर्मचारी यांच्या आर्थिक हिताची नसून यातून कर्मचारी वर्गाचे भविष्य अंधःकार मय आहे त्यासाठी शासनाने शिक्षक व कर्मचारी यांना
1982 पेन्शन योजना आणि 1984 भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करून कर्मचारी वर्गाचे हित जोपासवे अशी मागणी वारंवार करून ही शासन याकडे दुर्लक्ष करीत केलेलं आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे महाराष्ट्र शासनाने तात्काळ अंशदान पेन्शन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी महाराष्ट्र शासनाने जर जुनी पेन्शन योजना लागू नाही केली तर येणाऱ्या काळात शिक्षक व इतर कर्मचारी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा.
जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणी साठी शासनाचे लक्ष वेधण्यासासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तिनहात नाका जिल्हा ठाणे येथून मंत्रालय मुंबई पर्यंत पायी दिंडी आंदोलन जाहीर करण्यात आले आहे या पायी दिंडीत जत तालुक्यातील शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी होऊन ही दिंडी यशस्वी करावी असे आवाहन शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केले आहे यावेळी अविनाश सुतार बाळासाहेब सोलनकर दशरथ पुजारी शौकत नदाफ मल्लय्या नांदगाव,दयानंद रजपूत इ शिक्षक उपस्थित होते
No comments:
Post a Comment