जत,(प्रतिनिधी)-
भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी
आणि जतचे विद्यमान नगरसेवक उमेश सावंत यांच्यात झालेला वाद हा वैयक्तिक पातळीवरचा असून
याचा भाजपशी काही संबंध नाही. या दोघांवरही कारवाई
करण्यात यावी, असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.
शिवाय त्यांच्यावर काय कारवाई करायची,याचा निर्णय
पक्षश्रेष्ठीच घेतील, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी
पत्रकार बैठकीत दिली.
या बैठकीला डॉ. रवींद्र आरळी, अॅड. श्रीपाद अष्टेकर, अॅड. प्रभाकर जाधव, सुनील पवार,
सरदार पाटील, विजय ताड उपस्थित होते. भाजपाचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी यांच्या गाडीवर पाच सप्टेंबर रोजी
पहाटे तीनच्या सुमारास तालुक्यातील व्हसपेटनजीक जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि
सध्याचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत, अमीर शेख व अन्य
एकाने गोडोडगी यांची गाडी अडवून गाडीवर तुफान दगडफेक केली. तसेच
तिघांनी गुडोडगी यांना गाडीबाहेर काढून काठीने जबर मारहाण केली. यात ते जबर जखमी झाले.
गुन्हा दाखल होऊ नये,म्हणून आमदार विलासराव जगताप, डॉ.
रवींद्र आरळी यांनी मध्यस्थी केली. पण त्यांना
यात यश आले नाही. घटनेनंतर दोन दिवसांनी गुडोडगी यांनी जत पोलिसांत
उमेश सावंत आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल
झाल्यापासून उमेश सावंत आणि अन्य दोघे फरार होते. शनिवारी त्यांना
अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
No comments:
Post a Comment