अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला
फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी
विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही प्रयोग करूयात.
तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी
न देता विषारी कोब्रा डसवून मारू. त्याच्यासमोर एक मोठा विषारी
साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात
आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या
शरीरात सापाच्या व्हेनमसदृश्य विष आहे. आता हे विष कुठून आलं,
की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक
धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं ! आपल्या प्रत्येक
संकल्पामुळे पॉझिटिव किंवा निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात
हार्मोन्स उत्पन्न होतात. 90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी
उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे. आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी
भस्मासुर बनून स्वत:चा विनाश स्वत:च करतोय.
आपले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा. 25 व्या वर्षांपर्यंत आपल्याला चिंता नसते की, लोकं काय
म्हणतील? 50 व्या वर्षापर्यंत ह्याच विचारात जगतो की,
लोकं काय विचार करतील? 50 व्या वर्षानंतर समजतं,
की आपल्याविषयी कोणीही विचार करत नव्हतं!
....................................................................................................................
पुणेरी
मेडिकल दुकानातील पाटी... आम्हाला आमच्याकडील सर्व औषधांची एक्स्पायरी
डेट माहीत आहे, पण तुमची माहीत नाही. तेव्हा
कृपया उधार मागू नये.
*****
एका व्यक्तीने श्रीसद्गुरूंना विचारले उत्सव साजरा
करायला सर्वांत चांगला दिवस कुठला? श्रीसद्गुरूंनी
शांतपणे सांगितले - मरणाच्या एक दिवस अगोदर ! व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो. श्रीसद्गुरू
हसून म्हणाले जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून
सुरवात कर...!
No comments:
Post a Comment