Monday, September 17, 2018

Time please:थॉमस अल्वा एडिसन


एका मुलाच्या पालकांसाठी शाळेतील शिक्षकांनी एक चिठ्ठी दिली. आईने ती चिट्ठी पहिली आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली. त्यातील मजकूर असा होता...
 प्रिय पालक,
 आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठवू नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. ‘
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होतं. एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली. तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती. ती पाहताच तो ढसाढसा रडायला लागला. त्यातील मजकूर असा होता.
 प्रिय पालक,
आपला मुलगा मतिमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अशा मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठवू नये. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्यावा.‘
त्याला कळून चुकलं त्याच्या आईने ते पत्र खोटं वाचून दाखवीलं होतं. हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्खं जग प्रकाशमय करून टाकलं.
 *****
भांडणाने कुळाचा नाश होतो. वाईट शब्दांनी मित्र दुरावतात. वाईट शासकामुळे राष्ट्राचा नाश होतो. वाईट कृत्यांमुळे यश दूर जाते. म्हणून नेहमी चांगले काम करावे.
*****
काही वेळा आपली चूक नसताना ही शांत बसणं योग्य असतं... कारण जो पर्यंत समोरच्याचे मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही !
*****
बायको : तो कोपर्यावरचा भिकारी आहे ना... फार माजलाय हो...
 नवरा : कां? काय झालं?
 बायको : अहो, मी त्याला काल 2 चपात्या आणि भाजी दिली होती. आज त्याने मला एक पुस्तक दिलं.
 नवरा : पुस्तक? कोणतं?
बायको : चविष्ट जेवण कसे बनवावे



No comments:

Post a Comment